मावळसामाजिक

विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे रस्त्याच्या लगत रिट्रीट हेरिटेज समोर विजेचा उघडा डीपी बाॕक्स देतोय अपघाताला निमंञण.. 

Spread the love

विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे रस्त्याच्या लगत रिट्रीट हेरिटेज समोर विजेचा उघडा डीपी बाॕक्स देतोय अपघाताला निमंञण.. An open DP box of Vidya Prasarini Sabha’s primary and secondary schools near the road to Retreat Heritage is inviting accidents.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २० ऑक्टोबर.

विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे रस्त्याच्या लगत रिट्रीट हेरिटेज समोर विजेचा उघडा डीपी बाॕक्स लहान मुलामुलींचे अपघाताला निमंञण देत असल्याचे दिसून आले.

गवळीवाडा भागात बसस्थानकामधून व टपाल कार्यालयाचेबाजूने तसेच मुंबई पुणे महामार्गावरून शालेय विद्यार्थी रोज येथून हजारो च्या संख्येने येत जात असतात. या ठिकाणी रिट्रीट हेरिटेज या हाॕटेलचे बाहेरच एक डीपी बाॕक्स झाकण कुणीतरी काढून नेल्याने विजेचे आठ, दहा फ्यूज वायरिंग असे उघडे पडले आहे.हे आतिशय धोकादायक असून विद्या प्रसारिणी सभेच्या काही शिक्षकांचे व विद्यार्थी यांचे जीविताला धोकादायक असून वीज वितरण कंपनीकडून याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांची आहे.
हाॕटेलचा स्टाफ तसेच कर्मचारी , पर्याटकांनाही धोकादायक हा डीपी बाॕक्स असून विज वितरण कंपनीकडून शहरातील उघडे डीपी बाॕक्स तातडीने झाकणांचे टेंडर देवून ते बसवून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!