आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

डोंगरगाव येथे रस्त्याचे लगत कचराकुंडी नवीनच बसवण्यात आली असून तेथे कचरा अस्ताव्यस्त पसरलेला.

रोगराई ची भीती.

Spread the love

डोंगरगाव येथे रस्त्याचे लगत कचराकुंडी नवीनच बसवण्यात आली असून तेथे कचरा अस्ताव्यस्त पसरलेला; रोगराई ची भीती.At Dongargaon, a garbage bin has just been installed near the road and the garbage is scattered around; Fear of pestilence.

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी,४ ऑगष्ट.

डोँगरगाव येथे रस्त्याचे लगत कचराकुंडी नवीनच बसवण्यात आली असून तेथे कचरा अस्ताव्यस्त पसरलेला रोगराईची भीती आहे.या कच-यापासून खतनिर्मितीकरीता तो लोणावळा नगरपरिषदेकडे वलवण येथे जमा करावा , ज्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावणार नाही , अशी ग्रामस्थांची व लोणावळा पवनानगर मार्गावरून जा ये करणाऱ्यांची मागणी आहे.

लोणावळा पवनाधरणाकडे जाणाऱ्या या मार्गावर येथे डोंगरगाव वाडीचे हद्दीतील एका मोरीजवळ मातीचा भराव टाकून जागा सुधारून सपाट केली असून मोरीतील पाणी वाहून जाण्यासाठी एक नाली , चर खोदल्यामुळे पाणी वाहून जावू लागल्याने पाणी साचणार नाही. येथे पूर्वी कचराकुंडीला राडारोडा होता.

आता नव्याने रस्त्याचे बाजूला कचराकुंडी ठेवण्यात आली आहे.ती ओसंडून वाहत असून परिसरात दुर्गंधीयुक्त वास व रोगराई फैलावू शकते, त्यामुळे डोंगरगाव केवरे ग्रूपग्रामपंचायतीच्या वतीने ताबडतोब याबाबत लक्ष घालून काम करावे , अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

डोंगरगाव ग्रामपंचायतीचे परिसरात रस्त्याचे बाजूला झालेल्या दुकानदारांना व घरोघरी ग्रामस्थांना डस्टबीन वाटप केल्यास व घंटागाडीची रोज व्यवस्था केल्यास फार बरे होईल, आरोग्याची समस्या सुटेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!