आरोग्य व शिक्षण

बजरंग दल दुर्गावाहिनीच्या वतीने सीमेवरील जवानाना 4555 राख्या

Spread the love

तळेगाव :  येथून ‘एक राखी सीमेवरच्या भावासाठी’ या उपक्रमा अंतर्गत बजरंग दल दुर्गावाहिनी यांच्यावतीने जम्मू (रजोरी) सीमेवरील जवानांसाठी 4555 राखी पाठवण्यात आल्या.

 

आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सैनिकांना आपल्या घराचे दर्शन होणे तसे दुर्मिळच असते आणि त्यात कोरोनाची महामारी त्यामुळे हे जणू अशक्यच झाले.आपण आपले सगळे सण घरच्यांसोबत साजरे करतो, आणि एखाद्या सणाला घरी नसलो की खूप वाईट वाटते.आपले सगळे सण उत्साहात साजरे करताना ज्यांना जबाबदारी मुळे ते शक्य नाही त्यांना हा आनंद देणे ही आपली संस्कृती ह्याच अनुषंगाने विश्व हिंदु परिषद बजरंग दल दुर्गावाहिनीने ह्या वर्षीचे रक्षा बंधन जवानांसोबत साजरा करण्याचे ठरवले संतोष भेगङे पाटिल यांनी ही संकल्पना मांडली आणि लगेच त्या दिशेने पाऊल उचलले.

संपूर्ण मावळ तालुक्यतून राख्या पाठविण्यासाठी लोणवळा, तळेगाव, वडगाव, पवन मावळ, कामशेत,देहु, देहुरोङ इत्यादी ठिकाणी आवाहन करण्यात आले.अर्पिता  फाकटकर तसेच प्रांजल  बोडके व सई  मेहता ह्यांनी पुढाकार घेत सर्व प्रखंड व उपप्रखंड ह्यातून दुर्गांची निवड केली . त्यांना हा उपक्रम का घेत आहोत ह्याची कल्पना दिली,संदेश तयार केले,पोस्टर बनवले, राख्या कुठे जमा करायच्या ह्याचे नियोजन केले. ह्या नंतर हा मेसेज सोशल मीडिया वर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवला.

उपक्रमाला सर्व बजरंगी कार्यकर्ते, दुर्गा व मातृशक्ती ह्यांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. जे ठिकाण ठरवलेले त्यावर मोठ्या संख्येने राख्या जमा केल्या. जमा झालेल्या संपुर्ण राखी रजोरी जम्मू येथील सैनिक बांधवांना पाठवण्यात आल्या.

या उपक्रमात बाळा खांडभोर, महेन्द्र आसवले, स्वप्निल अंबोले, लक्ष्मण शेलार, दत्ता माळी, गणेश निसाळ, मोरेश्वर पोफळे निखिल पिंजण प्रवीण फाकटकर, बजरंग कांबळे योगेश शेटे, विकी शेटे, कपील देवादिगा आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

संपुर्ण तालुक्यातून 4555 राख्या जमा –

कमी वेळात आवाहन करुनही येवढ्या मोठ्या सन्खेने राखी जमा झाली, माता-भगिनिनी राखीच्या माध्यमातून सैनिकां प्रती आपली कॄतज्ञता व्यक्त केली असे संतोष भेगङे पाटिल यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!