ताज्या घडामोडी

महाराष्ट्र पत्रकार संघ जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडीया अध्यक्षपदी भागवत चव्हाण यांची निवड

Spread the love

जिंतूर / प्रतिनिधी

जिंतूर: महाराष्ट्र पत्रकार संघ या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटने अंतर्गत जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार यांची बैठक होऊन जिंतूर तालुका अध्यक्षपदी तरुण नवयुवक पत्रकार भागवत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यभरात पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र पत्रकार संघ ही पत्रकारांची संघटना श्री विलास कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून आज जिंतूर येथील शासकीय विश्रामगृहात परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांची तालुकास्तरीय कार्यकारिणी निवडण्यात आली यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकारांना संपूर्ण शासकीय कार्यालयातील माहिती पोलीस स्थानकातील घडलेल्या घटनेची तात्काळ माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक असल्याने ती गतीने मिळावी म्हणून या संदर्भात तातडीने पावले उचलली जातील असे यावेळी ठरविण्यात आले जिंतूर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, उपाध्यक्ष शेख रहीम भाई, सचिव अजमत खान पठाण, संघटक फिरोज भाई, सह-संघटक कयूम खान भाई, सदस्य सचिन रायपत्रीवार, शेख नईमुद्दीन यांची बिनविरोध निवड करण्यात घोषणा यावेळी करण्यात आली. निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!