ताज्या घडामोडी

साठे उद्योग समूहाचे संस्थापक सूरज साठे (दादा) यांच्या हस्ते नेर्लेतील जिल्हा परिषद शाळा नं.२ मध्ये ध्वजारोहण..

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा )

येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त साठे उद्योग समूहाचे संस्थापक सूरज साठे (दादा) यांच्या हस्ते नेर्लेतील जिल्हा परिषद शाळा नं.२ मध्ये ध्वजारोहण…….. सविस्तर असे की, साठे उद्योग समूहाचे उद्योजक , माननीय श्री.सुरज तानाजी साठे(दादा) यांना येथील शाळेचे आधारस्तंभ मानले जाते. सदरच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण उद्योजक सूरज साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष- विकास बल्लाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक बल्लाळ (भाऊ) प्रा.विकास बल्लाळ सर (मार्गदर्शक), तसेच अजिंक्य बल्लाळ, मुख्याध्यापक जमादार सर, रोकडे सर,रांजणे मॅडम,अडसुळे मॅडम , अंगणवाडी सेविका-जोशी मॅडम,गुजर मॅडम, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे-सुरज साठे (दादा ) यांचा शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वेळी उद्योजक सूरज साठे यांनी शाळेतील हॉलची नूतन फरशी कामांसाठी 15,000/ रुपयेचे योगदान दिले. सदरच्या या योगदानाबद्दल नेर्लेतील बौद्ध व मातंग तसेच सर्व स्तरातून साठे कुटुंब आणि साठे उद्योग समूहाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!