ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद कन्या प्रशालेत गुणवंतांचा सत्कार

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थीनीचा गुणगौरव, शैक्षणिक साहित्य वाटप, दानशूर व्यक्तीचा सत्कार सोहळा मंगळवारी (ता. ५) रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नूरअहमद घाटवाले होत्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे, सदस्य दयानंद साखरे, दयानंद मडोळे, सेवानिवृत्त शिक्षक गुरप्पा शेळके, माजी मुख्याध्यापक हणमंत शिंदे, माता-पालक वैशाली गवई, रेणुका घोडके, सुरेखा कदम, चित्रा काळे, सुनीता भोसले, उषा जाधव, मुस्कान बागवान, मुख्याध्यापिका सविता साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शालांत प्रमाण पत्र परीक्षेत भूमिका शिरगुरे, रोमा काळे, राधिका भोकले (प्रथम), निकिता घोडके (द्वितीय) व भाग्यवंती मंडले (तृतीय) क्रमांक मिळविल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार, दानशूर व्यक्ती सूर्यकांत सुर्ये, पुष्पाताई गव्हाणे, अजिंक्य कांबळे यांनी प्रशालेस शैक्षणिक साहित्य, गणवेश व आर्थिक सहाय्य केल्याबद्ल तर प्रशालेतून बदली झालेले बालाजी गाडेकर, अरुणा दुगम यांना निरोप व त्यांच्या जागी उपस्थित झालेले हरी शेके, बालाजी गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी ‘ क्रांतिरत्न ‘ या महाग्रंथात लेख, अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादरीकरण, तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार प्राप्त रुपचंद ख्याडे, अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादरीकरण, कवितासंग्रह प्रकाशन, तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. वंदना जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी गाडेकर, अरुणा दुगम, हणमंत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. नूरअहमद घटवाले यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, आता विद्यार्थीनीच्या पंखात बळ भरलेले असून त्यांनी गरुडझेप घेऊन उच्च शिक्षणात प्रगती करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. महादेव कुनाळे, बिना पोतदार, अलका गायकवाड, सुषमा जट्टे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रूपचंद ख्याडे यांनी केले. सूत्रसंचालन मंकावती कांबळे तर आभार ब्रह्मानंद कडते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!