ताज्या घडामोडी

डॉ. के. डी. शेंडगे उच्च माध्यमिक विद्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी)

डॅा. के. डी. शेंडगे उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. २६) रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. आप्पासाहेब सोनकाटे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ब्याळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. मोटे यांनी भारतीय संविधान आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सोनकाटे यांनी महापुरुष आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी बालाजी व्हनाजे उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी सूर्यवंशी व घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक लक्ष्मण जाधव, मारुती कांबळे, सिध्दाराम कुडकवलगे, महेबुब मुजावर,‌‌ व्यंकट लोहार, शीतल सुरवसे, मनीषा दुधभाते, एस. के. पाटील, महेश्वरी थोरात, प्रमिला माने, एम. जी. काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्मिता खंडागळे व आभार प्रेमनाथ पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!