ताज्या घडामोडी

शेख सिराज राष्ट्रीय स्तरावर शब्द श्री साहित्य सन्मान 2022 पुरस्कार

Spread the love

माँ भारती लेखन मंच जयपूर राजस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय साप्ताहिक प्रतियोगिता आयोजित केलेल्या उत्कृष्ट साहित्य  नवोदित लेखकासाठी उत्कृष्ट लेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध स्तंभलेखक शेख सिराज यांना रास्ट्रीय स्तरावर शब्द श्री साहित्य सन्मान 2022 पुरस्कार सन्मान प्रात झाल्याची माहिती ..  परिषदेचे अध्यक्ष श्री. कृष्णा सैन , गायत्री पहाड़ीवाल यांनी ही माहिती दिली. शेख सिराज यांनी स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शेख सिराज यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात यश संपादन केले. त्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शेख सिराज यांना शिक्षणरत्न पुरस्कार, साहित्य भूषण पुरस्कार, एकता गौरव पुरस्कार, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, आदिवासी मित्र पुरस्कार, आदर्श लेखक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, उत्कृष्ट प्रसिद्धी पुरस्कार, सुभेदार मल्हारराव होळकर राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, शहीद अश्फाक उल्ला खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्यसेवा गौरव आदि पुरस्काराने आतापर्यंत सन्मानीत करण्यात आले आहे. शेख सिराज यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतीक आणि सामाजिक विषयावर लेखन केलेले आहे. शेख सिराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना राज्य, जिल्हा, राष्ट्रीय पातळीवर ही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये ही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
शेख सिराज यांना  सष्ट्रीय स्तरावर शब्द श्री साहित्य सन्मान प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार, मित्र परिवार, शिक्षक मित्र व आप्तेष्टांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.ll

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!