ताज्या घडामोडी

मुंबईतील नर्सेसना बदलापूरातील प्रभाताई शिर्के यांच”माहेरवाशिण”ठरल महिलांसाठी हक्काच माहेरच घर

Spread the love

बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर)-

स्त्रीच लग्न झाल की ती माहेराहुन सासरी जाते.नविन घर जरा जुळवून घेण्यात वेळ जातो,मग सासुरवाशिण होते.वर्षानुवर्षे जातात,माहेरी जाण क्वचित होत.काही अनंत अडजणींमुळे माहेरपणाचा आनंद घेता येत नाही.पण आता माहेरपणासाठी येणा-या महिलांसाठी भारतातील पहिल हक्काचे माहेरघर(माहेरवाशिण)बदलापूर शहरात प्रभाताई शिर्के यांनी उभारलेल आहे.ब-याच महिला येथे माहेरपणासाठी येतात.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे वैद्यकीय यंत्रणा हतबल झालेली आहे,सर्व हाॅस्पिटल मधील परिचारिका या आपला जीव धोक्यात घालुन काम करत आहेत.त्यांना थोडाफार विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा,त्यांच माहेरपण आपण कराव या उद्देशाने”माहेरवाशिण”च्या संस्थापिका प्रभाताई शिर्के यांनी मुंबईतील ॠग्णालयातील महिला हेड इनचार्ज,परिचारिका यांना माहेरपणासाठी आमंत्रित केले होत.डी.एन.हाॅस्पिटल,सिध्दार्थ हाॅस्पिटल,नायगाव मॅटर्निटी,क्रांतीबाई सावित्रीबाई फुले या हाॅस्पिटलच्या ३५नर्सेस माहेरपणासाला आल्या होत्या.त्यांच स्वागत भाकरतुकडा अंगावरुन काढत,कुंकुमतिलक ओवाळणी करत,साग्र संगितात आपल्या माहेरच्या घरात प्रभाताई शिर्के यांनी स्वागत करत सर्वांचा घर प्रवेश केला.थोडा वेळ उसंत घेत खेळ खेळण्याची,गाणी म्हणण,संगीताच्या तालावर नाचण,मनमुराद घसण-खिदळण हे सर्व भान विसरून या सर्व परिचारिका आनंद घेत होत्या.प्रभाताई त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत होत्या.त्यांच्या पसंतीच जेवण त्यांना देण्यात आले.सर्वांना सुग्रास जेवणाचा आनंद घेतला.प्रभाताईंनी सर्वांच आदरातिथ्य आईसारखच केल.माया,ममता,करुणा,आनंद या परिचारीकेंच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. गप्पा-टप्पांचा फड रंगला होता.प्रत्येकाने या माहेर घरात आपली हौस भागवुन घेतली. सर्व नर्सेसच्या डोळ्यातील हसु आणि आसु प्रकर्षाने जाणवत होत.माहेरपणाला आल्यान जीवनाच सार्थक झाल,अशी भावना सर्वांची होती.प्रभाताईंच प्रेम,आईचा आशिर्वाद,आचार-विचारांची देवाण घेवाण, प्रफुल्लित होणार आनंदी कौटुंबिक वातावरण याचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.शेवटी घरी जाण्याची वेळ येते तेव्हा,सर्वांच्या डोळ्यात अश्रु तराळले.प्रभाताईंनी केलेल माहेरपण उराशी बाळगून जड अंतःकरणाने माहेर घराचा(माहेरवाशिण)निरोप घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!