ताज्या घडामोडी

माढ्याचे ज्ञानेश्वर(माऊली) सलगर यांची रासपच्या राज्याच्या मुख्य महासचिव पदी निवड

Spread the love

कुर्डुवाडी/प्रतिनिधी
माढा तालुक्यातील भुताष्ठे गांवचे सुपुत्र असलेले ज्ञानेश्वर(माऊली) सलगर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य महासचिव पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांच्या उपस्थिती करण्यात आली.
यशवंत सेने पासून महादेवरावजी जानकर यांच्या सोबत गेले २२ वर्ष काम करत असणार्या कार्यकर्त्याची राज्याच्या मुख्य महासचिव पदी निवड केली असून यापूर्वी त्यांनी यशवंत सेना सरचिटणीस बोरवली विभाग, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्या विविध पदांवर काम पाहिलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्राणी कल्याण महामंडळावर संचालक म्हणून देखील काम केले आहे. सामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्याचा प्रमुख पदांवर कामाच्या जीवावर जाऊ शकतो. काम करणाऱ्या माणसाला रासप मध्ये नक्कीच संधी दिले जाते. माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांनी व केंद्रीय नेतृत्वानी दिलेली जबाबदारी सांभाळताना सर्व घटकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्र मध्ये रासपची संघटनात्मक ताकद उभा करून राष्ट्रीय समाज पक्ष एका नव्या पर्वाला सुरवात करत असल्याचे मत नूतन मुख्य महासचिव ज्ञानेश्वर(माऊली) सलगर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!