ताज्या घडामोडी

एका अनोख्या सत्यशोधक विवाहाची यशस्वी वर्षपूर्ती

Spread the love

वशी येथील सुनिल पाटील व माया  यांच्च्या  वैवाहिक जिवणाच्या वर्षपूर्तीनिमीत्ताने समाजाची सामाजिक बांधिलकी पार पडण्याच्या उद्देशाने एक छोटासा बदल करण्याच्या दृष्टीने पार पाडलेली एक भूमिका  यशस्वीपणे पार पाडली.26 जानेवारी हा आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो .याच प्रजासंत्ताक दिनी  सुनील  व मायाने समाजाचे देणे लागतो या उद्देशाने एक सत्यशोधक पद्धतीने व समाजशील उपक्रमांनी 26 जानेवारी 2021 रोजी विवाह  केला. त्या विवाहास बघता बघता एक वर्ष  पूर्ण झाले.

हे त्यांना  समजलेच नाही पण पुन्हा त्याच उमेदीने त्याच आशेने व त्याच जिद्दीने व ध्येयाने पुन्हा वैवाहिक जीवनाच्या दुसर्‍या वर्षाची सुरुवात समाजाचे देणे लागतो या उद्देशाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी  सांगली जिल्ह्यातील एच आय व्ही ग्रस्त कुटुंबातील मुला- मुलींचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देणाऱ्या दिलासा भवन या सामाजिक संस्थेला भेट दिली. त्या वंचित असणाऱ्या मुला मुलींचे व शिक्षण संस्थेचे माहिती जाणून घेतली व त्यांना या  विवाह पद्धतीची थोडक्यात माहिती दिली. कुटुंबा तीलाच एक भाग असणाऱ्या दिलासा भवन च्या बाल मित्रांना त्यांच्या वैश्विक महा मारीच्या रोगांचा सामना करण्यासाठी छोटीशी पण खूप लोक उपयोगी पडेल अशा कालावधीमध्ये वैवाहिक जीवनाच्या वर्षपूर्ती निमित्त वाफारा मशीन आरोग्याच्या काळजी च्या दृष्टीने खूप महत्त्वाची असल्या चे विचार पूर्वक निर्णय घेऊन या मुलांना वाफारा मशीन भेट दिल्या ..व एक छोटीशी मदत करून आपल्या सामाजिक बांधिलकीची भूमिका पार पाडण्याचे काम  या उभयंतांनी व  सहकाऱ्यांनी पार पाडले.सोबत माधव गडदे वर्षा गडदे आकाश पाटील रूपाली बनसोडे विराज बनसोडे हे सर्व सहकारी मित्र होते .त्यांना देखील ही मदत करण्याची पद्धत खूप आवडली तसेच दिलासा भवण संस्थेच्या सर्व बाल मित्रांनी व संस्थेच्या स्टाफ बांधवांनी  या अनोख्या वैवाहिक जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्या प्रेरणादायी व आनंददायी उर्जा दाई ठरतील अशा पद्धतीने आपल्या समाजातील सर्व विवाह वाढदिवस तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये समाजामध्ये वंचित घटकांना थोडीशी जरी मदत केली तरी कोट्यावधी वंचित गरीब व गरजू व्यक्तींच्या अडचणी सुटतील असे  प्रांजळ मत सुनील पाटील, माया व  जनक्रांती टीमने व्यक्त केले.

माया व माझ्या वैवाहिक जीवनाची एक वर्ष पूर्ती 26जानेवारी 2022 या रोजी झाली आम्ही आमच्या वैवाहिक जिवनाच्या वैवाहिक सुरुवाती वानीच आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात एका अशा महान क्रांतिकारी व्यक्ती चे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले ते कॅप्टन रामचंद्र श्रिपती लाड महान क्रांतिकारक सैनानी व्यक्ती* म्हणजे ज्या वेळेला आपला भारत देश पारतंत्र्या मध्ये होता पण त्या पारतंत्र्याच्या 1947 च्या कालावधिच्या ही आधी संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या जुलमी व लुटारू दहशतीखाली होता त्याच्या आधी सुमारे दहा वर्ष म्हणजे 1936 च्या दरम्यानचा कालावधिमध्ये भारतामधील महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमी तील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1000 पेक्षाही जास्त गावांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे सहकारी ” तुफान सेनेचे” कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड म्हणजेच (रामभाऊ लाड )ज्या वेळी इंग्रज सरकारला संपूर्ण देश घाबरत होता अशाच वेळी सातारा प्रति सरकार नेतृत्व करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तूफान सेनेचे नेतृत्व करणारे कॅप्टन रामभाऊ लाड हे अजून जिवंत आसतिल का हे देखिल कूनास पटनार नाही पण ते वयाच्या अवघ्या 100राव्या वर्षा मध्ये जगत आहेत ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 5000 पेक्षाही जास्त सैनिकांची “तुफान सेना “अशी एक बटालियन होती त्या बटालियन च्या सैनिकांचे कॅप्टन रामभाऊ लाड यांचा असा दरारा होता की संपूर्ण इंग्रज सरकार च्या सेनेचे अधिकारी यांच्यासमोर तुफान सेनेचे नाव काढले की इंग्रज सरकारचे अधिकारी थर थर कापत असत अशा कॅप्टन रामभाऊ लाड यांचे नातू आमचे खास मित्र ते म्हणजे दिपक लाड ते रणसंग्राम सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून कुंडल वाळवा व पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये सामाजिक कार्य करत असतात तसेच अनेक जणआदोलने अन्याया विरुद्ध व अत्याचाराविरुद्ध करत असतात त्यांना हा वारसा आपल्या आजोबां पासूनच मिळाला ते हि सर्व सामाजिक कामे सांभाळून आपल्या आजोबांची सेवा रोज न चुकता तीन ते चार तास करतात तसेच दिपक लाड याच्या आई व पत्नी अर्चना लाड या देखिल रामभाऊ लाड यांची सेवा रोज न चूकता करत असतात त्यामुळेच आज कॅप्टन रामभाऊ लाड यांचे वय 100 वर्षांमध्ये ते काही महिन्यामध्येच पदार्पण करतिल अशा या महान क्रांतिकारी तुफान सेनेच्या कॅप्टन भाऊ यांचे मी व मायाने दर्शन घेतले व आमच्या वैवाहिक जीवनाच्या च्या दुसऱ्या वर्षाचे सुरुवात करण्याचे ठरवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!