ताज्या घडामोडी

समाजातील सर्व घटक व शासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून काम केल्यास देश प्रगतीपथावर जाईल-गट विकास अधिकारी संतोष कुमार राऊत

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
समाजातील सर्व घटक व शासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून कामे केल्यास देश प्रगतीपथावर जाईल व सर्व घटकांमध्ये एकसंधपना निर्माण होईल असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष कुमार राऊत यांनी केले, ते सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ नागपूर यांच्या वतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रदीपकुमार कुडाळकर म्हणाले की या संस्थेने निवड केलेले सर्वच स्तरातील व्यक्ती ह्या कर्तव्यनिष्ठ आहेत. सर्वांनीच आपल्या कार्यातून लोकांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे.या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे उपाध्यक्षा करुणा मोहिते व व सुनील कांबळे सर यांनी केले.
यावेळी माननीय संतोष कुमार राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती शिराळा यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव, मधुवंती धर्माधिकारी यांना आदर्श केंद्रप्रमुख, डेपो मॅनेजर विद्या कदम यांना उत्कृष्ट कार्य गौरव, संदीप कुढचीकर यांना समाजप्रबोधक, शिवाजी शिंदे यांना अपंगासाठी कार्य गौरव, मोहन पवार यांना उपक्रमशील शिक्षक, मनीषा कुरणे यांना उपक्रमशील शिक्षिका, रामराव पाटील यांना उपक्रमशील शिक्षक राजनंदनी कदम यांना महाराष्ट्राची बाल सावित्री , महादेव हवालदार यांना उत्कृष्ट लेखन कार्य आधी पुरस्काराने सर्वांना गौरविण्यात आले ‌. या कार्यक्रमासाठी शिक्षक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनंत सपकाळ,अध्यक्ष प्रताप गायकवाड, , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शर्मिला पवार, नंदिनी हवालदार, अधिक देसाई, सुनील झिमूर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित यादव यांनी प्रास्ताविक करुणा मोहिते यांनी तर आभार महादेव हवालदार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!