ताज्या घडामोडी

जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्म्यांना अभिवादन

Spread the love

जाकादेवी /वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये फार मोठे योगदान देणाऱ्या वीर, जवान, देशभक्त, थोर क्रांतिकारक यांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीपर स्फुर्तिदायक काव्य सादर केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी महात्मा गांधींजींच्या विश्व मानवतेचा दिव्य संदेशांचा उल्लेख करून म.गांधी यांची शिकवण अनुसरण्याचे आवाहन करताना स्वच्छता मोहिमेचे महत्त्व विशेद केले.यावेळी त्यांनी हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक भूपाळ शेंडगे, तुकाराम दरवजकर, नामदेव वाघमारे, केशव राठोड, योगेश चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील,शिवानंद गुरव, संदीप कुराडे,सुशांत लाकडे,अमित बोले, मंदार रसाळ,सौ.नेहा परकर,सौ. प्राची पवार, सौ.वैष्णवी साळुंके,सौ.स्नेहल माने यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली.प्रारंभी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!