ताज्या घडामोडी

शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नावाचे गहाणखत करून टाकावे डॉ. विनय नातू : सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला चपराक दिली

Spread the love

खंडाळा (प्रतिनिधी): १२ आमदारांचे निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला सणसणीत चपराक दिली आहे. आता तरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शहाणपणाच्या गोष्टी ऐकवाव्यात. किंवा शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नावाचे गहाणखत करुन टाकावे. अशी प्रतिक्रिया भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. नातू यांनी म्हटले की, १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव कायद्याच्या दृष्टीने दुर्भाग्यपूर्ण, असंवैधानिक, बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने कुचकामी आहे. हा निर्णय हकालपट्टीपेक्षा वाईट आहे. सभागृहात या मतदारसंघाचे प्रतिनिधी नसताना कोणीही प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यामुळे ही फक्त सदस्याला शिक्षा होत नाही तर संपूर्ण मतदारसंघाला शिक्षा होते”. अशी टिप्पणी मा. न्यायालयाने केली आहे. आघाडी सरकारने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचे ठरविले असल्याने ते एकापाठोपाठ एक बेकायदा निर्णय घेत आहेत. आ. प्रताप सरनाईक यांना बेकायदा बांधकामाबद्दलचा दंड माफ करण्याचा निर्णयही अशाच बेकायदा पद्धतीने घेण्यात आला आहे.
१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्या अशी विनंती भारतीय जनता पार्टीने आघाडी सरकारकडे वारंवार केली होती. मात्र सत्तेच्या गुर्मित असलेल्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यानंतरही सत्ताधाऱ्यांची गुर्मी उतरण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच या आमदारांना विधीमंडळात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील , अशी भाषा भास्कर जाधव यांच्यासारखे नेते करीत आहेत. मात्र या विषयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अभ्यासू नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!