ताज्या घडामोडी
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे या रस्त्याचा उपयोग इंदिरा आवास या वस्तीसह विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ.ऋतुजा राजेश जाधव यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून ह्या रस्त्याचा निधी मंजूर केला आहे. या प्रसंगी दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर , सैतवडे (गुम्बद) सरपंच सौ.उषा सावंत, श्री नारायण पावरी,काँन्ट्रँक्टर श्री देसाई यांनी श्रीफळ वाढवले.या रस्ता कामाची सुरवात झाल्याने सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून सौ.जाधव यांचे आभार मानले आहेत.