ताज्या घडामोडी

सह्याद्री प्रतिष्ठान संस्थे तर्फे 30 रोजी शिराळा भुईकोट किल्ला या ठिकाणी स्वच्छता मोहिम संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सहयाद्री प्रतिष्ठान गेली 13 वर्षे पासून गड किल्ले संवर्धन चे काम करत आले आहे.या वर्षी माझी वसुंधरा अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सदर मोहिमेत गडावरील बुरुज, तटबंदी आणि शिवकालीन एकूण 3 विहीर साफ करण्यात आली. या वास्तूवर संवर्धन पर स्वच्छतेचे काम करण्यात आले. सोबत पुढील कार्याची रेकी करण्यात आली.
मोहिमे करीता शिराळा नगर नगरपंचायत चे मुख्याधिकारी मा. योगेश पाटील व दत्त नागरी पतसंस्थेचे दिनेश हसबनीस विशेष सहकार्य लाभले.

या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील सहयाद्री चे दुर्ग सेवक ,बेळगांव, जत, आटपाडी, कोल्हापूर, सांगली येथून मोहिमे साठी आले होते. या मोहिमेसाठी एकूण ९० दुर्गसेवक आणि दुर्गसेविका यांचा सहभाग होता.
या दुर्ग संवर्धन मोहिम वेळी प्रशांत कुंभार, दादुस मानकर, निखिल जाखले, विनायक बांदल , निखील खोत, पूनम पाटील, विशाल लाहीगडे, स्वप्नील पाटील , सचिन शिंदे, प्रणव महाजन, लक्ष्मण मलमे (नगरपंचायत शिराळा) व बंटी नांगरे, रणजित सिह नाईक, महादेव नाना, सनी आवटे, निलेश आवटे, यांचे विशेष सहकार्य लाभले. दत्त सहकारी पत संस्था यांच्याकडून चहा, नाश्ता चे नियोजन केले होते. शिराळा नगरपंचायत कडून स्वच्छ ता साठी जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला.
त्याबरोबरच श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चे संस्थापक चेअरमन व विद्यमान व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ पी बी कुलकर्णी, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, भारती सहकारी बँक. शाखा इस्लामपूर चे शाखाधिकारी विजय कुलकर्णी, दत्त नागरी चा परिवार यानी ऐतिहासिक गोरखचिंच परिसराची स्वच्छता केली.
सर्व सहभागींना शिराळा भुईकोट विषयी विषयी, तसेच संस्था सह्याद्रीच्या कार्या बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. या स्वच्छता मोहीम वेळी संभाजी महाराज कर्तुत्व कथन आणि शिव प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!