ताज्या घडामोडी

सरकारच्या वाईन विक्रीचा फायदा कोणाला..?

Spread the love

कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडे, या पासून वाईन निर्मिती प्रयोग दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यशस्वी केला आहे , मात्र, लाखो टन वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून वाईन निर्मितीला सरकारची परवानगीच नसल्याने गेले अनेक वर्ष हा प्रकल्प धूळखात पडला आहे , तसेच गेली अनेक वर्ष कोकणातील बागायतदारांचे लाखो टन काजू बोंडे वाया जात आहेत

सरकारने नुकतीच किराणामाल दुकान व मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे परंतु हे धोरण कोकणी शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचा सुर लावला जात आहे परंतु शासनाने वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीचे स्वागतही केले जात आहे. कोकणात वाईन ला परवानगीसाठी प्रगतशील शेतकरी माधव महाजन पाठपुरावा करत होते ,
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू विजय मेहता यांनी कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून वाईन निर्मिती धोरणाला प्रोत्साहन दिले होते , त्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या वायनरी प्रकल्पात काजू करवंद जांभूळ यापासून वाईन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला होता , 2006 ते 2007 साली काजू बोंडापासून वाइन निर्मिती झाली परंतु काजू बोंडापासून वाइन उद्योगाला परवानगी नसल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाईन निर्मिती साठी शेतकरी पुढे आले नाहीत त्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेली वाईन विद्यापीठाच्या संशोधनाचा एक भाग बनून राहिली गेली 15 वर्ष वायनरी प्रकल्प व विद्यापीठाने निर्माण केलेली वाईन जैसे थे आहे विद्यापीठाने निर्माण केलेल्या काजू बोंडापासून च्या वाईन चा दर्जा उत्कृष्ट असल्याचा अहवाल ले पकडून प्राप्त झाला परंतु सरकारच्या धोरणाचा फटका या संशोधनाला बसल्याने गेली पंधरा वर्ष वाईन प्रयोग यशस्वी होऊन सुद्धा पुढे काही होऊ शकले नाही विद्यापीठाने आपल्या स्तरावर फळापासून वाईन निर्मिती करून शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक दाखविण्या पलीकडे काहीही केले नाही
कोकणातील काजू , करवंद , जांभूळ वाईन प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोकणातील फणस आंबा कोकम चिकू या फळापासून सुद्धा वाईन बनवण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून सुरू असून यापूर्वी बनवण्यात आलेल्या वाईन आरोग्यास उपाय कारक असल्याचे सिद्ध झाले आहे

वाइनच्या विक्रीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कोकणातील जाणकारांकडून स्वागत केले जात आहे येथील प्रगतिशील शेतकरी व लघु उद्योजक यांच्यामध्ये वाईन निर्मिती व विक्री याबाबत शासनाने आणखी पुढे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे फक्त विक्रीची व्यवस्था न पाहता वाइनच्या निर्मितीसाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे

कोकण कृषी विद्यापीठाने अनेक वर्षे संशोधन करून जांभूळ करवंद फणस व काजू या फळांपासून वाईन निर्मितीचा प्रयोग यशस्वी करून दहा वर्षे लोटली आहेत ही वाईन सर्व चाचण्या पार करून पुढील निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे आता गरज आहे ती शासनाच्या योग्य हालचालीची कोकणामध्ये वरील फळे मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात शासनाने वाईन निर्मितीची प्रक्रिया खुली केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला काम मिळेल ,वाया जाणाऱ्या फळांचे पैशात रूपांतर होईल परिणामी कोकणात उद्योग वाढीला लागून बेकारी नष्ट होण्यास मदत होईल ,गोवा राज्यातील काजू फेणी चे उदाहरण आपल्या समोर आहेच ,नाशिकमधील द्राक्ष प्रक्रियेचा ही दाखला आपल्याला परिचित आहे ,अशाच प्रकारे कोकणातील काजू कोकम जांभूळ करवंद फणस या फळांच्या मुबलक उपलब्धतेचा शासनाने विचार करायला हवा ,निव्वळ वाईन विक्री न करता तिच्या निर्मितीसाठी कोकणात परवानगी देण्याबाबत सरकारने विचार करावा अशी कोकणातून मोठी मागणी पुढे येत आहे 

किराणा मालाचे दुकान मध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे परंतु कोकणातील वाया जाणाऱ्या फळापासून वाईन निर्मिती ला प्रोत्साहन द्यायचे असेल तर काही जाचक शिथिल करणे गरजेचे आहे तरच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारच्या नव्या धोरणाचा फायदा होईल असा विश्वास प्रगतशील शेतकरी माधव महाजन यांनी व्यक्त केला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!