शिराळ्यात तळीचा कोपरा,गणपती चौक परिसरात अतिक्रमणे,नगरपंचायतीने हद्द ठरवून घ्यावी – नगरसेवक उत्तम डांगे
शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील तळीचा कोपरा गणपती चौक परिसरामध्ये अतिक्रमण वाढत असून नगरपंचायतने तातडीने मोजणी करून आपल्या हद्दी कायमस्वरूपी करणे गरजेचे आहेत अशी मागणी नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केली.
नगरसेवक डांगे म्हणाले , शिराळा नगरपंचायतीच्या हद्दीमधील गणपती चौक तळीचा भाग या जागेची मोजणी करून घेणे गरजेचे आहे. याच्या अगोदर शिराळा नगरपंचायत यांनी मोजणी केलेली होती पण त्या मोजणीच्या खुणा व नंबर अस्तित्वात नाहीत .त्यामुळे अति तातडीने मोजणी करून घेणे आवश्यक आहे, शिराळा शहरांमध्ये बेरोजगारांचे प्रमाण अधिक प्रमाणात निर्माण झाले आहे. तळीचा भाग येथील आपल्या हद्दी ठरवून घेऊन नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होनेश मदत होणार आहे. सद्या सर्वच स्थरामध्ये बेकारी मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे. शिराळ्यातील बेरोजगार व होतकरू मुलांना छोटे-मोठे व्यवसायासाठी भाड्याने जागा देऊन नागरपंचायतचे उत्पन्न वाढवनेसाठी मोठे काम होणार आहे. नागरपंचायतने याठिकाणी जुने व्यासाईक यांचा गाळे देताना प्रधाण्याने विचार करावा. भविष्यामध्ये त्या जागेवर ती सांस्कृतिक हॉल व सभोवताली दुकान गाळे याचा आराखडा करून येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणेस मदत होणार आहे. व नगरपंचायत चे ही उत्पन्न वाढनार आहे.
त्यामुळे नगरपंचायतने या ठिकाणी जागेची मोजणी करून घेऊन एक चांगला निर्णय घ्यावा अशी बंडा डांगे नगरसेवक यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे.