ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना संकलन केंद्रामुळे हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार.! कु. प्रगती पालांडे; संकलन केंद्राच्या सेमीनारचा दिमाखात शुभारंभ

Spread the love

वैभववाडी/प्रतिनिधी

फॅक्टरी आणि शेतकरी यांच्यामधील मध्यबिंदू ठरणारा एम सी एल व्हिलेज प्रोजेक्टमुळे आगामी काळात आखवणे, भोम पुनर्वसन परिसरात पालेभाज्या, फळभाज्या व फुले या सेंद्रिय बियाण्यांची लागवड करणार आहोत. तसेच जवळपास २५ ते ३० जुन्या वाणांची लागवड पावसाळ्यात केली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार आणि संकलन केंद्रामुळे हक्काची बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. फॅक्टरी आणि शेतकरी यांच्यामधील मध्यबिंदू ठरणारा एम सी एल व्हिलेज प्रोजेक्ट असणार आहे. संपूर्ण तालुक्यात अशी ३४ संकलन केंद्रे उभे राहणार असल्याची माहिती एमसीएलच्या संचालिका कु. प्रगती पालांडे यांनी सांगितली.
मीरा क्लीन फ्यूल लिमिटेड मुंबईच्या संयुक्त विद्यमाने ‘वैभववाडी जैविक उत्पादक कंपनी’ बायोफ्युएल स्टार्टअप कंपनी ‘ऊर्जा रिजनरेशन प्राइवेट लिमिटेड’ जैव इंधन प्रकल्प वैभववाडी तालुक्यात घेऊन आले आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक व भूमातेची काळजी घेणाऱ्या अशा स्वच्छ इंधनाची निर्मिती करणे, सेंद्रिय खताची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देणे आणि तालुक्यातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे हे आहेत. संकलन केंद्राच्या माहितीसत्रांचे पहिले सेमिनार वैभववाडी तालुक्यातील पुनर्वसन आखवणे-मांगवली गावठाण ग्रामपंचायत येथे पार पडले. या संकलन केंद्रासाठी सर्व प्रथम पसंती आखवणे ग्रामपंचायती मधील महिलांनी दाखवली. यावेळेस आखवणे, भोम, नागपवाडी, पालांडेवाडी, जांभवडे या गावातील महिला उपस्थित होत्या.

_चर्चा सत्रात मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे-_

१) शेतकऱ्यांनी हत्ती गवताची लागवड करण्यासाठी लागणारे बियाणे-कापणी नंतर संकलन करण्याचे ठिकाण
२) हत्ती गवताचा शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव
३) सेंद्रिय शेती, पालेभाज्या, फळभाज्या, सेंद्रिय खते
४) सेंद्रिय हत्ती गवताचे बियाणे, सेंद्रिय पालेभाज्या बियाणे, सेंद्रिय फळभाज्या बियाणे
५) गावातील पारंपरिक शेतीला सेंद्रिय शेतीत बदलणे सोबतच, पडीक जागा हत्ती गवताच्या लागवडीसाठी आणल्याने स्थानिक शेतकऱ्यांना होणारा थेट आर्थिक फायदा
६) MEP– MCL ECO FRIENDLY PRODUCT
७) सेंद्रिय पशुपालन आणि त्यातून निर्माण होणारे उद्योजक व संकलन केंद्रामुळे लघु उद्योगाला मिळणारी चालना
८) संकलन केंद्र हवे असल्यास लागणाऱ्या गोष्टी, अटी व आर्थिक फायदे
९) संकलन केंद्रामुळे स्थानिक वाहने व वाहनचालकांना होणारा थेट आर्थिक फायदा
१०) संकलन केंद्रामुळे स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार
अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली. संपूर्ण तालुक्यात ३४ संकलन केंद्रे उभी राहणार असल्याची माहिती कु. प्रगती पालांडे यांनी दिली.
यावेळी बोलताना आखवणे गावच्या सरपंच सौ. आर्या कांबळे म्हणाल्या की, वैभववाडी तालुक्यातील आखवणे गाव हे जंगल क्षेत्र असलेल्या ठिकाणी वसलेले आहे. येथील मातीत रासायनिक खताचा एकही कण नसल्याने आताच्या वेळेस १००% सेंद्रिय असलेले असे हे एकच गाव आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या पावसाळ्यात ७० ते ८० वर्ष जुने असलेले धान्य, पालेभाज्या, फळभाज्या, फुले या सेंद्रिय बियाण्याची लागवड करणार आहोत अशी माहिती ‘ऊर्जा रिजनरेशन प्राइवेट लिमिटेड एमपीओच्या संचालिका कु. प्रगती पालांडे यांनी दिली. जेणे करून भविष्यात येथे सेंद्रिय बियाणे बँक उभी राहू शकेल. जवळपास २५ ते ३० जुन्या वाणांची लागवड येथे पावसाळ्यात होणार आहे, ज्यात नाचणी, वरी, हरिक, भाताची जात जी मधुमेह रुग्णांना साठी उपयुक्त आहे. ज्यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते. रासायनिक खतामुळे झालेले आजार हे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून थांबवण्यासाठी मदत करतील. तसेच चवळी, वाल, घेवडा, वांगी, टोमॅटो, मिरची, पालेभाजी, पालक, मेथी, भोपळा, काकडी, भेंडी अशा अनेक भाज्यांची वाणे असणार आहेत असे कु. प्रगती पालांडे यांनी सांगितले. यातून स्थानिक लोकांना रोजगार आणि संकलन केंद्रामुळे हक्काची बाजारपेठ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!