ताज्या घडामोडी
बांबवडे येथे प्रबोध गायकवाड यांच्या कृषी सेवा केंद्राचे उदघाटन
शिराळा प्रतिनिधी
बांबवडे (ता. शिराळा) येथे प्रबोध गायकवाड यांनी नव्याने सुरू केलेल्या शेतकरी कृषी सेवा केंद्राचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ‘विश्वास’चे संचालक सुकुमार पाटील, विश्वास पाटील, वाळवा पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पाटील, जालिंदर पाटील मोहन पाटील, पंकज पाटील तसेच ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.