ताज्या घडामोडी

डॉ.शैलेश माने यांनी केली माळेवाडीच्या रुग्णावर कृत्रिम सांधेरोपन शस्त्रक्रिया

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर

शिराळा शहरांमधील साई हॉस्पिटलमध्ये कोकरूड-माळेवाडी येथील रूग्णावर अतिशय किचकट असणारे खुब्यावरील कृत्रिम सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश आले असून इथुन पुढील काळात सर्वसामान्यांना माफक दरात सेवा देणार असे प्रतिपादन साई हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेश माने यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. शैलेश माने म्हणाले, कोकरूड-माळेवाडी येथील मदन जाधव यांना खुबा दुखीचा त्रास होत होता. त्यांचे दुखणे त्यांना असह्य होत होते. त्यावेळी ते आमच्याकडे हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी आले. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या असता त्यांच्या खुब्यातील हाडांना रक्त पुरवठा होत नसल्याने तेथील हाडांचा गट्टू कुजला असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्याठिकाणी कृत्रिम सांधा बसविणे गरजेचे होते.
संबंधित रूग्ण मदन जाधव यांना अनेक वर्षांपासून खुबा दुखीचा त्रास होत होता. किरकोळ दुखणे असल्या कारणाने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु सदरचा हा त्रास वाढत गेल्याने त्यांना चालणे, बसणे, तसेच दैनंदिन कामे करताना त्रास होवू लागला. यावेळी त्यांनी बांबवडे, कराड, शाहूवाडी, कोल्हापूर, इस्लामपूर आदीं ठिकाणी या दुखण्याबाबत उपचार सुरू केले. यावेळी त्यांना खुब्यातील हाडाचा गठ्ठू कुजणे (A Vascular Necrosis) यामुळे संबंधित भागाला रक्तपुरवठा नसल्याने रूग्णास असह्य वेदना होत होत्या. या दुखण्यावर शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय असल्याचे अनेक ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच शास्त्रक्रियेचा खर्चही या रूग्णाला न परवडणारा होता. त्यामुळे रूग्ण व त्याचे नातेवाईक चिंतेत होते.
यावेळी जाधव यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कमी खर्चात चांगली उपचार पध्दती अवलंबून त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी केली.
रूग्णास त्यांच्या नातेवाईकांनी शिराळा येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला.व सदरचा रूग्ण शिराळा येथे साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला. डॉक्टरांनी आजाराबांबतच्या तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. अगदी कमी खर्चात अतिशय किचकट असणारी यशस्वी शस्त्रक्रिया जाधव यांच्यावर केली.
त्यामुळे मदन जाधव या रूग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे सदरच्या रूग्णाचे दुखणे थांबून तो रूग्ण आता आपली स्वत:ची कामे स्वत: करत आहे.
यावेळी डॉ. शैलेश माने यांना मिरज येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओंकार कुलकर्णी, भूलतज्ञ डॉ. समृध्दी माने यांनी सहकार्य केले.
हाडांच्या उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी रूग्णांना आता कोठेही मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. शिराळा सारख्या डोंगरी भागात  साई हॉस्पिटलमध्येच ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेबरोबरच मणक्याच्या शस्त्रक्रिया, जॉइंर्ट रिप्लेसमेंट, दुबिर्णीने सांध्यातील शस्त्रक्रिया करण्याची सोय झाल्याने रूग्णांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!