क्रीडा व मनोरंजन

जी पी पारसिक सहकारी बँकेतर्फे आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँकेतर्फे मर्यादेत षटकांच्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ही स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ९ आणि १० एप्रिल रोजी रंगणाऱ आहे. मंगळवारी अचानकपणे तुमचे आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे स्टेडियमच्या व्यवस्थापनाने बँकेच्या व्यवस्थापनाला कळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. परंतु आता स्टेडियमच्या व्यवस्थानपनाने आरक्षण कायम असल्याचे सांगितल्यावर स्पर्धा होणार आहे.स्पर्धेत सोळा सहकारी बँकांचे संघ सहभागी होतील. त्यात यजमान जी पी पारसिक सहकारी बँकेच्या दोन संघासह ठाणे भारत सहकारी बँक, कल्याण जनता सहकारी बँक, डीएनएस बँक, ठाणे जनता सहकारी बँक, अपना सहकारी बँक, दि सिटी को ऑपरेटिव्ह बँक, चेंबूर नागरिक सहकारी बँक, हिंदुस्तान को ऑपरेटिव्ह बँक, सारस्वत बँक, अभ्युदय बँक, वसई जनता सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक, बसिन कॅथलिक सहकारी बँक, एनकेजीएसीबी सहकारी बँक, वसई विकास सहकारी बँकेचे संघ रोख बक्षिसासाठी लढत देतील. सहभागी बँकेच्या एका संचालकाला संघातून खेळण्याची मुभा दिली आहे. स्पर्धेतील विजयी, उपविजेत्या संघासह सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस रोख बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यादरम्यान सर्वोत्तम खेळाडूला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!