ताज्या घडामोडी

घबकवाडी गांवामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येवून गांवाचा सर्वागिन विकास साधा- वाळवा तालुका गटविकास अधिकारी डॉ . आबासाहेब पवार

Spread the love

घबकवाडी गांवामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येवून गांवाचा सर्वागिन विकास साधावा असे मनोगत वाळवा तालुका गटविकास अधिकारी डॉ . आबासाहेब पवार यांनी केले .

घबकवाडी , ता . वाळवा जि . सांगली येथील ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामांच्या नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर बैठकित प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी डॉ . आबासाहेब पवार म्हणाले कि , शासन अनुदानापेक्षा प्रथम आपण स्वःता गुंतवणूक करणे आवश्यक , जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांनी कसे टिकुन रहावे याचा विचार आवश्यक आहे पारंपारीक पध्दतीने शेती न करता कौशल्यापूर्ण शेती कशी करावी . पर्यावरण संतुलित ठेवून आपण पुढील पिढी कशी वाचवु शकतो, मुलांचा शारीरिक , मानसिक , बौध्दीक व सर्वांगिन विकास करणेसाठी काय करावे तसेच याचा विचार तरुण पिढीने करणे आवश्यक आहे . आपले गांव स्वच्छ , निर्मल राखणेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे . गावातील अडी अडचणी गांवातच सोडविल्या पाहिजेत यापुढे आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी काळजी घेवूनच आपआपले काम केले पाहिजे . सांडपाण्याची व्यवस्था , शेतीच्या बाबतीत नवनविन आधुनिक यंत्रणेचा वापर करून कमीत कमी खर्चात चांगले नियोजन करता येते , ग्रामस्थांनी शोश खड्डा , मँडप , गोबर गॅस , शेत बांधावर वृक्षारोपण , फळ झाडे लावावीत , परसदारात भाजीपाला पिकवावा , विज निर्मितीबाबत सोलर सिस्टिमचा विचार करावा , शासनाच्या मनरेघा योजनेतून अनेक कामे करता येतात , पाण्याचा वापर योग्यरितीने करण्यासाठी नेहमी अग्रेसरपणे काम करणे आवश्यक आहे . बाजारपेठेतील निरनिराळी रायनिक खते , शेती औषधामुळे जमिनिचा पोत कमी होवू लागला आहे . यासाठी शेण खत , सेंद्रिय शेती , शेतातील पाला पाचोळा शेतातच न पेठविणे असे उपाय करणे आवश्यक आहे . शासन जसे आपणास सहकार्य करते तसे आपण सर्वांनी शासनास सहकार्य करून आदर्श गांव करणेसाठी कामाचे उत्तम नियोजन केले पाहिजे .

प्रारंभी ग्रामसेविका सौ . धनश्रीताई पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून योजनेचा मुख्य उद्देश सांगीतला . घबकवाडी गांवचे सरपंच संजय कदम यांच्या हस्ते प्रमुख पाहूणे श्री . डॉ . आबासाहेब पवार यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला . यावेळी तालुका विस्तार अधिकारी दाईगडे साहेब , ए.पी. ओ . अमोल पवार साहेब , सरपंच संजय कदम यांनी आपली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास उपसरंपच सौ . सुरेखा पवार , ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कदम , सदस्य रविद्र भारती , माजी सरपंच विनायकराव कदम , माजी सदस्य दिपकराव खोत , श्रीरंग घबक , सौ . उषाताई पवार, संपतराव कदम, भाऊसो कदम, अर्जून कदम यांच्या सह सर्व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते .

शेवटी आभार बजरंग कदम यांनी मानले , कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व सर्व सदस्य यांनी केले. कोरोणा साथिच्या प्रादूरभावाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!