ताज्या घडामोडी

कुंभार समाजाला न्याय मिळवून देणार – ओबीसी व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:- ओबीसी व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयात विविध खात्याचे अधिकारी व कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुंभार समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक घेऊन कुंभार समाजाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले. या बैठकीला विशेष आमंत्रित म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुंभार समाजाला त्रास होऊ नये यासाठी तातडीने निर्णय घ्यावा असा आदेश दिला. तसेच संत गोरोबाकाका मातीकला बोर्ड तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करावी. अशी सूचना खादी ग्रामोद्योग बोर्ड व उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना केली.कुंभार समाजातील विटा व्यावसायिकांना शासन निर्णयानुसार सवलत मिळावी.तसेच या निर्णयाचा अवमान करणार्‍या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येईल.असे आश्वासन दिले. कुंभार समाजाचे छोटे गृप बनवून क्लस्टर योजना सुरू करावी. त्यासाठी ओबीसी महामंडळाकडून बिनव्याजी आर्थिक सहाय्य दिले जाईल.तसेच महिलांना देखील विविध प्रकारच्या योजनेतून महिला आर्थिक विकास मंडळाच्या वतीने सहाय्य केले जाईल. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, प्रदेश चिटणीस तथा बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, अनंत कुंभार, वसंत घोडनदीकर, सुधीर चांदेकर, प्रकाश भालेराव, अमित कुंभार, सौ.रसिकाताई खेडेकर, दिनेश महाराज दरेकर, नंदू वाघ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री मा.सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कुंभार समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कुंभार समाजाच्या वतीने निवेदन सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!