ताज्या घडामोडी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे आज दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी धरणे आंदोलन

Spread the love

तेथून पुढील विषयावर लक्ष वेधण्यासाठी सदर धरणे आंदोलन करण्यात आले.

१) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बेकायदेशीर कृतीला आळा घालण्याबाबत .

२)स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रतिटन १०/- रुपये कपात करण्याचा दिनांक ०६जानेवारी २०२२चा शासन निर्णय रद्द करणेबाबत.

३)राष्ट्रीय हितरक्षणासाठी एकल आसवानी प्रकल्पांना हवाई अंतराच्या अटीतून सूट देण्याबाबत.

४)वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबत.

५)शेतीमालावरील निर्यात बंदी उठवण्याबाबत.

६)शेतीला रेडिरेकनर प्रमाणे कर्ज पुरवठा करणेबाबत.

याबाबत मा.जिल्हाधिकारी सांगली यांना भेटून सविस्तर निवेदन दिले.

यावेळी उपस्थित राज्य कार्यकारणी सदस्य शेतकरी संघटना महादेव कोरे, सांगली मिरज शहरध्यक्ष कमलेश्वर कांबळे, पूर्व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील,मिरज तालुकाध्यक्ष माणिक माळी, सांगली जिल्हा सरचिटणीस प्रदीप कार्वेकर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष शंकर मोहिते, माजी मिरज तालुकाध्यक्ष आमगोंड पाटील,अविनाश पवार, दिपक येसूमाळी, यशवंत चव्हाण, मारूती माळी,सयाजी पाटील, अरूण क्षीरसागर, राजू चव्हाण, अशोक शिंदे,विलास शिंदे,राजू बिरनाळे आदि उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!