ताज्या घडामोडी
न्याहळोदला आता सुटीच्या दिवशीही शाळा
शिर्डी प्रतिनिधी
न्याहळोद येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. राहिलेला अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण व्हावा, यादृष्टीने रविवारीही शाळा भरवल्या जात आहेत. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यासाठी रविवारीसुद्धा शाळा भरवण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष दिलीप उपाध्ये यांच्या सूचनेने संस्थेने घेतला आहे. रविवार म्हटलं, की शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची सुटी असते. परंतु येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्ये यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून, यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.