ताज्या घडामोडी

महाराष्ट्र पत्रकार संघ शिराळा तालुक्याच्या वतीने पत्रकारांचा गौरव

Spread the love

कोकरूड /वार्ताहर
पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ शिराळा तालुक्याच्या वतीने शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.यावेळी
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी संतोष पाटील व शिराळा तालुका अध्यक्षपदी बाजीराव घोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

जाधववाडी ता.शिराळा येथील चांदोली रिसॉर्ट येथे आयोजीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सपोनि ज्ञानदेव वाघ, प्रसिद्ध बिझनेस कोच सोपान शेडगे, साहित्यिक वसंत पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट प्रमुख उपस्थितीत होते.
सपोनि वाघ म्हणाले की, प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेमधून करायला हवे.वेगळे विषय,सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
बाबासाहेब परीट म्हणाले की, पूर्वीच्या काळच्या पत्रकारितेमधील आव्हाने वेगळी होती.सध्या सोशल मीडिया चा जमाना आला असून प्रत्येक पत्रकाराने जागरूक बातमीदारी करायला हवी.
साहित्यिक वसंत पाटील म्हणाले कि,पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.सर्व सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून होत आहे.प्रत्येकाने वास्तववादी बातम्यांना महत्व द्यायला हवे.
सोपान शेडगे म्हणाले की,अभ्यासपूर्ण पत्रकारिता करायला हवी.आपण जे महत्वाचे काम करतो, त्याची शाबासकी स्वतःला द्यायला हवी.यातूनच नवीन प्रेरणा स्वतःला मिळते.नेहमी उत्साही जीवन जगण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे.
-राज्य कार्यवाहक – प्रतापराव शिंदे(दै.पुण्यनगरी), विभागीय अध्यक्ष – नारायण घोडे(मराठीयन), विभागीय सदस्य – दिनकर झाडे(दै.केसरी), सांगली जिल्हा अध्यक्ष – संतोष पाटील(दै.तरुण भारत), जिल्हा संघटक – शिवाजी पाटील(दै.लोकमत), शिराळा तालुका अध्यक्ष – बाजीराव घोडे(दै.सकाळ), आदींसह पश्चिम भागातील पत्रकार जी जी पाटील, शिवाजीराव कुंभार(शेतकरी न्यूज), – बिपीन पाटील(दै.पुढारी), कार्याध्यक्ष – नथुराम कुंभार(दै.महासत्ता), – अनिल झाडे(दै.केसरी), – याकूब मुजावर(दै.महासत्ता), एन. जी.पाटील(दै.सकाळ), हिंदुराव पाटील (दै.जनप्रवास),बाबा परीट(दै.लोकमत),अशोक जाधव(एसबीएन मराठी )प्रितम निकम(दै.तरुण भारत), नवनाथ पाटील(संपादक द शिराळा न्युज), सहदेव खोत(दै.लोकमत), आनंदा सुतार (दै.लोकमंथन), संजय पाटील (दै.पुण्यनगरी), संजय घोडे पाटील (दै.पुण्यनगरी), दत्तात्रय पाटील(संपादक ज्ञानदर्शन),सुरेश पवार (दै.पुण्यनगरी), गणेश माने (दै.पुण्यनगरी), हिम्मत नायकवडी(दै.सकाळ)बालेखांन डांगे (दै.लोकमत),अविनाश जाधव (दै.पुढारी), विजय राठोड (दै.जनमत), कृष्णा कांबळे (दै.सकाळ) आदींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ,वही,पेन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!