ताज्या घडामोडी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा खो-खोत महाराष्ट्र, दिल्ली व ओडीसाची विजयी घोडदौड

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

पंचकुला, हरयाणा, १० जून, (क्री. प्र.): खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दुसर्‍या दिवशीच्या सत्रात साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी हरयाणावर मात करत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. तर सकाळच्या सत्रातील अन्य लढतीत दिल्ली, ओडिसा संघानेही विजय मिळवला. कालच्या दिवसात मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगनाचा व मुलींच्या सामन्यात तामिळनाडूचा परभव करत विजयी सलामी दिली. त्याच बरोबर मुलांच्या गटात दिल्लीने आंध्र प्रदेशचा, ओरीसाने छत्तीसगडचा व प. बंगालने हरियाणाचा पराभव करत विजय मिळवला तर मुलींच्या गटात ओरीसाने राजस्थानचा, कर्नाटकने प. बंगालचा, पंजाबने हरियाणाचा पराभव केला.

हरयाणा येथे सुरु असलेल्या सामन्यांमध्ये दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी हरयाणा संघावर ११-१० असा एक डाव १ गुणाने विजय मिळवला. पहिल्या आक्रमणात महाराष्ट्राने हरणाचे ११ गडी बाद केले. हरयणाला आक्रमणात अवघे ५ गडी बाद करता आले. मध्यंतराला सहा गुणाची आघाडी असल्यामुळे हरयाणाला फॉलोऑन देण्यात आला. दुसर्‍या आक्रमणातही हरयाणाने पाच गडी बाद केले. यामध्ये विजयी महाराष्ट्र संघातर्फे अश्‍विनी शिंदेने ३ मिनिटे, नाबाद १:२० मि. संरक्षण व २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळ केला. तर श्‍वेता वाघने २:३०, १ मि. 30 सें., संरक्षण करत १ खेळाडू तर संपदा मोरेने १:३०, २:३० मि. संरक्षण व २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. पराभूत हरयाणातर्फे स्विटीने १:३०, १:२० मि. संरक्ष करताना २ खेळाडू बाद केले. मिनूने १:५० मि. संरक्ष करताना २ खेळाडू बाद करुन चांगली साथ दिली.

मुलांच्या गटात महाराष्ट्राने हरयाणाचा १५-११ असा १ डाव ४ गुणांनी पराभव केला. प्रथम आक्रमण करणार्‍या महाराष्ट्राने हरयाणाचे १५ गडी बाद केले. यामध्ये सुफियान शेख आणि रोहन कोरेने धारदार आक्रमण करत प्रत्येकी ३ गडी बाद केले. किरण वसावेने २:३० मि; नरेंद्र कातकडेने २:४० मि. पळतीचा खेळ केल्यामुळे हरयाणाला ४ गडी बाद करता आले. मध्यंतराला ११ गुणांची आघाडी असल्यामुळे हरयाणाला फॉलोऑन दिले. दुसर्‍या डावातही हरयाणाने ७ च गडी बाद केल्यामुळे महाराष्ट्राने सहज विजय साजरा केला.

आज झालेल्या उर्वरित सामन्यांमध्ये मुलांच्या गटात दिल्लीने छत्तीसगडचा १ डाव ३ गुणांनी तर मुलींमध्ये ओडीसाने पश्‍चिम बंगालवर ५ गुणांनी विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!