आपला जिल्हा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नांगरगाव येथे अन्नदान

 

लोणावळा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नांगरगाव शिवसेना शाखेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांच्या वतीने नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला व लोणावळा शिवसेना शहरप्रमुख बबनराव अनसुरकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना विभाग प्रमूख उल्हास भांगरे , हिंदूस्थान माथाडी कामगार सेना नांगरगाव विभागीय मारुती जाधव ,उपविभागप्रमूख किशोर भांगरे , युवासेना उपाध्यक्ष विवेक भांगरे , गटप्रमूख बाळासाहेब जाधव , गटप्रमूख अनिल भांगरे , भाजप लोणावळा शहर उपाध्यक्ष सचिन साठे , अर्जून दुर्गे , शिवेसैनिक बाळासाहेब भांगरे , प्रशांत जाधव , आतिष भांगरे , मयूर दळवी , रामदास न्हालवे , अनिल येवले , विजय ढोकळे , प्रतिक जाधव , तुषार भांगरे , जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जाधव , शांताराम भांगरे , शांताराम नाणेकर आणि लोनपा शिक्षण मंडळ मा. उपसभापती प्रदीप थत्ते उपस्थित होते .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये