राजकीय

सांगली जिल्ह्यात युवकांचे संघटन करण्याचे काम जोमाने सुरु – विराज नाईक

Spread the love

शिराळा  प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करण्याचे काम जोमाने सुरू आहे, असे प्रतिपाद युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले. आज (ता. 18) पलूस येथे तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते निवडीच्या पत्रांचे वाटप झाले. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद गटनेते शरदभाऊ लाड, पलुस तालुका अध्यक्ष मोहन पाटील, कार्याध्यक्ष विनायक महाडिक, महिला तालुकाध्यक्षा सौ. नंदाताई पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पूजाताई लाड, अध्यक्ष इंद्रजित पवार, कामगार संघटना अध्यक्ष तानाजी मोकाशी, युवती तालुका अध्यक्षा प्राजक्ता जाधव, पदवीधर संघ तालुका अध्यक्ष अधिक थोरबोले, कडेगाव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, वैभव पवार नवनियुक्त पदाधिकारी व युवक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!