ताज्या घडामोडी

पक्ष प्रवेशापूर्वीच शिराळ्यात राष्ट्रवादीची “मेल” सुसाट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

माजीमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रीवादीतील पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच यशवंत ग्लुकोजचे चेअरमन रणधीर नाईक यांनी शिराळा येथील राष्ट्रीवादीच्यावतीने आयोजित विकास कामांच्या उद्घाटनास हजेरी लावून पुढील काही दिवसात होणाऱ्या पक्ष प्रवेशाचे संकेत दिले.” या कार्यक्रमामुळे माजी राज्यमंत्री नाईक यांच्या पक्ष प्रवेशाला पूर्वीच राष्ट्रवादीची मेल सुसाट सुटल्याचे दिसून येत आहे”.
शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी येथे विविध गल्यांच्या नामफलकाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात रणधीर नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांनी हजेरी लावली.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या सौदर्य वाढीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे.भुईकोट किल्ल्यावर संभाजी महाराजांच्या होणाऱ्या स्मारकाचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. चांदोली पर्यटन, संभाजी महाराज स्मारक यामुळे शिराळचे नाव पर्यटनाच्या नकाशावर ठळक दिसले पाहिजे. शिराळा विस्ताराची सुरवात प्राध्यापक कॉलनीने केल्याने शिराळ्याला शहराचा दर्जा मिळाला. या शहराला विविध कामासाठी १५ कोटीचा निधी आणला आहे.
रणधीर नाईक म्हणाले, शिराळा येथील महत्वाच्या असणाऱ्या अडचणी दूर होत आल्या आहेत. शिराळा बंटी पाटील मित्र परिवार व नगरपंचायतीच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न करून प्राध्यापक कॉलनी येथील प्रत्येक गल्लीत मध्ये नामकरण फलक लावण्यासाठी पुढाकार घेतला. शिराळा तालुक्याला अनेक वेळा उपाध्यक्षपद मिळाले. परंतु अनेक वर्षाने चेअरमनपद आमदार मानसिंगराव नाईक यांना मिळाले आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील शेतकरी व इतर संस्थाच्या विकासला त्यांचा मोलाचा हातभार लागेल.
प्रारंभी सांगली जिल्हा म.बैंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मानसिंगराव नाईक व सांगली जिल्हा युवक अध्यक्षपदी विराज नाईक यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.
घन:श्याम आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी पंचायत समिती सभापती भगतसिंग नाईक, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, नगरसेवक गौतम पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, विश्वासचे संचालक विश्वास कदम, यशवंत निकम, विश्वप्रतापसिह नाईक, पृथ्वीसिंग नाईक , विजयकुमार जोखे, बंटी पाटील, प्रा. सतिश माने, माजी नगराध्यक्ष सुनिता निकम, नेहा सुर्यवंशी, सूजाता इंगवले, सीमा कदम, संजय हिरवडेकर, दस्तगीर अत्तार,अजय जाधव,संजय जाधव, राजू निकम, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. रफिक आत्तार यांनी आभार मानले, सुत्रसंचलन ॲड. विलास झोळे-पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!