ताज्या घडामोडी

सकारात्मक विचार तणावमुक्त जीवनाची संजीवनी : भगवान भाई यांचे प्रतिपादन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

वारंवार मनात चालणारे नकारात्मक विचार हेच वर्तमान काळातील अनेक समस्यांचे कारण बनत आहेत. मनातील नकारात्मक विचार हेच तणाव उत्पन्न करतात त्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता आहे. असे उद्गार ब्रह्माकुमारीज् माउंट आबू येथील राजयोगी भगवान भाई यांनी व्यक्त केले. शिराळा नगरपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले सकारात्मक राहायचे राहण्याने अनेक समस्यांचे समाधान मिळू शकते. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा वाईट यामध्ये चांगले पाहण्याचे प्रयत्न केल्याने मनावर नियंत्रण ठेवू शकते. मनात चालणाऱ्या विचारामुळे स्मृती वृत्ती भावना दृष्टीकोण व व्यवहार बनत असतात. आपल्या मनात चालणारे विचार नकारात्मक चालले तर भावना दृष्टिकोन व विहारांमध्ये दूषितपणा येऊ शकतो. तनाव मुक्त जीवनासाठी सकारात्मक बदल ही संजीवनी आहे, असे त्यांनी सांगितले. शरीरस्वास्थ्यासाठी नेहमी पाय गरम व डोके थंड असणे म्हणजे गरजेचे आहे. पण माणसांच्या वारंवार चालणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे डोके गरम व पाय थंड असे उलटे झाले आहे. परिणाम मानसिक व शारीरिक रोग वाढत चालले आहेत.विचारांचा खजाना अध्यात्मिक गोष्टीतून मिळतो. ते पुढे म्हणाले की स्वतःला ओळखणे परमपिता परमात्मा ओळखणे आणि जीवन जगण्याचा उद्देश समजणे हीच खरी अध्यात्मिकता आहे.सकारात्मक बनवणे हीच काळाची गरज आहे. सकारात्मक विचार करणारा प्रत्येक परिस्थितीवर सहज विजय प्राप्त करू शकतो. समाजाच्या अभ्यासा मुळे मनोबल वाढते खऱ्या सुख शांती ची अनुभूती होते. चंद्र सूर्याच्या ही वरती राहणाऱ्या परमपिता परमात्मा मन बुद्धीने आठवण करणे यांच्या गुणाचे गुणगान करणे हा परमात्म्याच्या शिकवणीला त्याच्या वचनाला जीवनात अंमल करणे त्यामुळे जीवनात बदल घडून येतो.यावेळी स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका डी के वंदना बहन यांनी सुद्धा आपले उदबोधन देत सांगितले की वर्तमान वेळी राजयोगाच्या सतत अभ्यासामुळे मनाची एकाग्रता वाढते. जीवनाकडे दैवी कोणाचा समावेश होऊ लागतो.
. त्यामुळे दिवसभराच्या ताण-तणावापासून आपण दूर राहू शकतो. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नायब तहसीलदार ए डी महाजन, बी.के. राजश्री, नगरपंचायत मधील काही नगरसेवक नगरसेविका अधिकारी-कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!