ताज्या घडामोडी

वारणानगर येथिल गंगासागर फ्रुट बॅंन्डच्या उत्पादनांनी नावलौकिक मिळविला आमदार डॉ.विनय कोरे

Spread the love

कोकरुड/प्रतिनिधी
वारणानगर येथिल केशवा कॅनिंग फुड इंडस्ट्रीज माध्यमातून गंगासागर बॅंन्डच्या अग्रगण्य उत्पादनांनी अल्फावधीत नावलौकिक मिळविला आहे असे प्रतिपादन आमदार डॉ विनय कोरे यांनी केले.ते वारणानगर पेपरमिल परिसरातील पोवार कुटुंबाच्या केशवा कॅनिंग फ्रूट इंडस्ट्रीजच्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे,जि.प.अध्यक्ष डॉ.अशोकराव माने ,सौ शुभलक्ष्मीताई कोरे,सौ.स्नेहाताई कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार कोरे पुढे म्हणाले की, पोवार कुटुंबायांनी कोकणातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने घेतलेल्या फळ उत्पादकांच्या माध्यमातून उत्पादन केलेला दर्जेदार माल खरेदी करून आपल्या केशवा
कॅंनिग फूड इंडस्ट्रीच्या मधुन गंगासागर बॅंन्डखाली मॅंगो पल्प,कोकम,आगळ आदी विविध प्रकारची दर्जेदार प्रकारचे उत्पादन घेतली आहेत. ती वारणा ज्युस सेंटर च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचवली आहेत. या उत्पादनांनी अल्फावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. पोवार कुटुंबायानी गेली एकाव्वन वर्षे प्रामाणिक पणे आंबा विक्री व्यवसाय सांभाळला आहे. या काळातील ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे ते फळ उद्योगातील इंडस्ट्रीज कडे वळले आहेत. यावेळी बाळासो पोवार ,संजय पोवार यांच्या हस्ते आमदार डॉ विनय कोरे यांचा फेटा,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सागर पोवार,अक्षय पोवार , रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!