ताज्या घडामोडी

मातोश्री हिराई देशमुख विद्यालयात शिवजयंती साजरी

Spread the love

कोकरुड/वार्ताहर

कोकरुड ता शिराळा येथील मातोश्री हिराई देशमुख विद्यालय व निनाईदेवी कन्या विद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संध्या पाटील व पत्रकार प्रतापराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आदेश मोहिते , आदर्श काकडे , जयवर्धन टकले , पार्थ नांगरे , आराध्य शिंदे , राही वाघमारे , अन्वेशा घोडे, ऋतुजा मावळे , शर्वरी जाधव ,ईश्वरी नांगरे आदींनी शिवरायांच्या विषयी भाषणे केली.यावेळी बोलताना मुख्याध्यापिका संध्या पाटील म्हणाल्या की, शिवरायांनी मोजक्या पण विश्वासू सहकाऱ्यांना घेऊन स्वराज्य निर्मिती केली. असंख्य अडचणींवर मात करित रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांचे आचार,विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.शिवरायांचे कार्य प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमास मातोश्री विद्यालयाचे शिक्षक मनोहर कांबळे ,तानाजी पोतदार, सुशांत सवदी, कोंडी भाऊ गायकवाड, मानिराम चौधरी , विकास जाधव ,जयवंत लोहार , आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!