ताज्या घडामोडी

गिरगाव धनगरवाड्यावर सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

Spread the love

गिरगाव धनगरवाडा ता.भुदरगड जि. कोल्हापूर येथे सकाळी ०८:०० वा. शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर फोंडे चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला (टेबलवरील पुतळ्याला) मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी कै. स्व. शिवाजीराव देसाई (माजी उपसभापती, पंचायत समिती भुदरगड) यांचे सुपुत्र श्री. राजू शिवाजीराव देसाई राष्ट्रवादी काँग्रेस भुदरगड तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्या मंदिर गिरगाव धनगरवाडा येथील मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय नाटले (सर) उपस्थित होते. यावेळी श्रीमती. तागुबाई फोंडे यांनी जमिनीवर माथा टेकून ‘म्हाराज जगातला करूना तेवढा घालवून टाक, आणि सर्वांना सुखानं सांभाळ’ असे मुखातून उद्गार काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, तो विषय कार्यक्रमस्थळी चर्चेचा ठरला. यावेळी कामगार संघटनेचे प्रमुख नेते, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.संदीप फोंडे यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. विशेष करून धनगर शक्ती साप्ताहिक भुदरगड तालुक्याचे प्रतिनिधी भिकाजी फोंडे, यशवंत क्रांती संघटनेचे तालुका संघटक श्री.बबन फोंडे धुळाप्पा फोंडे, बाबुराव फोंडे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!