ताज्या घडामोडी

एक्सेल कंपनी च्या वतीने दहावी साठी मार्गदर्शन ..डॉक्टर दिलीप देशमुख

Spread the love

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे येथे एक्सेल कंपनी मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण तद्द डॉ. दिलीप देशमुख यांनी गणित सारख्या अवघड विष याची गोडी सोप्या भाषेत समजावून सांगितले व उदाहरणे सोडवून दिली व अभ्यास कसा करावा याचे विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन एक्सेल कंपनी चे मॅनेजर श्री पाटणकर साहेब व समन्वयक श्री. शेंडे साहेब यांनी केले कार्यक्रमाचे उदघाटन पाटणकर साहेब श्री. शेंडे साहेब व डॉक्टर यांनी दीप प्रज्वलन करून व सरस्वती फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले .यावेळी श्री. पाटणकर साहेबानी भाषणात 1994 =95 साली NSS कॅम्प DBJ कॉलेज व एक्सेल युनिटचे अधिकारी सर्व मिळून श्रमदान करून शाळेस ग्राउंड व कंपाऊंड तयार करून दिले जुन्या आठवणी ना उजाळा दिला तसेच या शाळेस कोणतीही मदत केली जाईल असे सांगितले. मुख्याध्यापक श्री बसवंत सर यांनी कंपनीने केलेल्या कामाचे आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साक्षी दार आहोत .श्री. गगन ग्रास साहेब श्री. जावडेकर साहेब, जिजामाता शिक्षण संस्थेचे संचालक श्री. चंद्रकांत चाळके श्री. बजागे साहेब शेंडे साहेब यांनी श्रम दानं केले शाळेस ग्राउंड तयार करून दिला. संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी सर्वतोपरी मदत केली असे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोखंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कुळे सर यांनी केले. सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!