ताज्या घडामोडी

परियत्ती संडे धम्म स्कूल वरवडे येथे शिवाजी महाराज यांची जयंती

Spread the love

परियत्ती संडे धम्म स्कूल वरवडे रत्नागिरी,
सध्या तक्षशिला महाबोधी बुद्ध विहाराचे दुरूस्ती काम सुरू असल्यामुळे विहाराच्या पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परियत्ती संडे धम्म स्कूलमधील मुलांनी साजरी केली.कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदने नंतर महाराजांच्या प्रतिमेसमोर चंद्राबाई जाधव(जेष्ठ कार्यकारी महिला) यांनी फूलं अर्पण केली.मुलांनी भाषण,गाणी,पोवाडा आणि प्रश्न-उत्तराने महाराजांची जयंती साजरी केली.
साडेतीन वर्षांची लहान मुलगी पृथ्वी सावंत भाषण करण्यासाठी पुढे येते आणि कोणाच्याही शब्दांची मदत न घेता जय भिम बोलून आपल्या अडखळणार्या शब्दांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराज म्हणत प्रणाम करते, ही साधी सोपी गोष्ट मुळीच नाही.
पृथ्वी हिला पहिला नंबर तर मिळालाच त्याच बरोबर समोर बसलेली वरिष्ठ मंडळी,रंजित जाधव सर आणि सर्व मुलांकडून कौतुकाच्या टाळ्या तितक्याच मिळाल्या.या कार्यक्रमांच्या आयोजनाचे सर्व श्रेय परियत्ती संडे धम्म स्कूलमधील मुलांचे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!