ताज्या घडामोडी
कासेगाव येथे देवराज पाटील यांचा सत्कार व शुभेच्छा.
शिराळा प्रतिनिधी
कासेगाव (ता. वाळवा)येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेटून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजभूषण सचिनकाका पाटील, कासेगाव चे उपसरपंच दाजी गावडे, कासेगाव ग्रा.पं.सदस्य सुजित पाटील,कासेगाव ग्रा.पं.सदस्य अमृत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.