ताज्या घडामोडी

नेर्ले येथील रस्ते व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

नेर्ले (ता. वाळवा) येथे आमदार स्थानिक विकास निधीतून व २५/१५ योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ३० लाख रुपये खर्चाच्या रस्ते व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. प्रारंभी आमदार नाईक यांनी १० लाख खर्चाच्या मोडा पाणंद मुरुमीकरणाचा, पुनर्वसन वसातीमधील सामाजिक सभागृह बांधकामाचा व बन रास्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास वीरकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी उपसभापती विलासराव पाटील, सरपंच छायाताई रोकडे, माजी उपसरपंच सुरेश पाटील, हेमंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बबन पाटील, कृष्णा कारखाना संचालक संतराव पाटील, जयसिंग पाटील, सुभाष पाटील, शुभंम पाटील, आप्पासाहेब, राजाराम, प्रकाश व अनिल कुंभार, धनाजी पाटील, डी. एस. पाटील, हणमंत पाटील, सर्जेराव शिद, राजाराम माळी, खंडू गडाळे, सुभाष पाटील, सोसायटी नंबर 2 चे एकनाथ पाटील, सोसायटी नंबर 1 चे सर्जेराव पाटील, धनाजी पाटील, धावजी अनुशे, दिनकर गडाळे, सदाशिव गडाळे, हंबीरराव रनखांबे, अशोक वाठारकर, बाबासो चव्हाण, नारायण रोकडे, दादासो वाठारकर, काशिनाथ शिंदे, पांडुरंग वाठारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!