ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी सेवा मंडळातर्फे आज चेंबूरमध्ये रक्तदान शिबीर

Spread the love

मुंबई – चेंबूरमधील घाटले गाव परिसरातील खारदेवनगर भाजी मार्केटजवळ उद्या रविवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ आयोजित अखिल खारदेवनगर घाटला सार्वजनिक गणेशोत्सवातर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे यांनी दिली आहे.

गोवंडी पोलीस ठाणे व विभागातील सर्व गणेशोत्सव व सामाजिक मंडळे,निबाण सामाजिक संस्था,श्री कॉम्प्युटर इन्स्टिटय़ुट, विद्यालंकार क्लासेस आदींच्या विशेष सहकार्याने हे भव्य रक्तदान शिबीर पार पडणार आहे.राजेंद्र नगराळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ ही सामाजिक संस्था वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.या मंडळाच्या कार्यक्रमांना सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थिती लावत असतात.उद्या होणार्‍या रक्तदान शिबिरासाठी वांद्रे येथील मुंबई महापालिकेच्या के.बी.भाभा जनरल रुग्णालय रक्तपेढीचे विशेष योगदान मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!