आरोग्य व शिक्षण

महापारेषणच्या उपकेंद्रातील बिघाडामुळे भोसरी,आकुर्डीतील साठ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद

Spread the love

पिंपरी : महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100एमव्हीए क्षमतेच्या पावर ट्रांसफार्मर मध्ये बुधवारी (दि.23) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला.त्यामुळे भोसरी व आकुर्डीतील घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे.

मात्र महापारेषण कडून या पावर ट्रांसफार्मरमधील बिघाड शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे भार व्यवस्थापन शक्‍य होत नसल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकलेली नाही.

त्यामुळे प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर, नेहरू नगर, यशवंत नगर, शांतिनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर, आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरू असून‌ सहकार्य करण्याचे आवाहन महापारेषण कडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!