आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

विसापूर किल्ल्यावर रायगड मधील एक मुलगा पडला व जखमी; शिवदुर्ग मिञचे टीमकडून यशस्वी रेस्कु आॕपरेशन..

रेस्कु आॕपरेशन करत सुखरूप गडाखाली स्टेचरवरून उतरवून घेतल्यानंतर रूग्णालयात दाखल केल्याची यशस्वी कामगिरी शिवदुर्ग मिञचे टीमचे वतीने पार पाडण्यात आली.

Spread the love
विसापूर किल्ल्यावर रायगड मधील एक मुलगा पडला व जखमी; शिवदुर्ग मिञचे टीमकडून यशस्वी रेस्कु आॕपरेशन..

आवाज न्यूज:लोणावळा ता.१४(प्रतिनिधी ) विसापूर एक दुर्गप्रेमीं तरूण पडून जखमी झाल्यावर त्यास रेस्कु आॕपरेशन करत सुखरूप गडाखाली स्टेचरवरून उतरवून घेतल्यानंतर रूग्णालयात दाखल केल्याची यशस्वी कामगिरी शिवदुर्ग मिञचे टीमचे वतीने पार पाडण्यात आली.

विसापूर किल्याचे आत एक मुलगा पडून जखमी झाल्याचा फोन टीमचे पदाधिकारी यांना साडेतीन वाजता आला. त्यानंतर लगेचच शिवदुर्ग रेस्कु टिम मदतीसाठी निघाली.
यश मेहता माणगाव रायगड व त्यांचे मित्र विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आले होते. चालताना पाय घसरून सुमारे साठ फुट तो खाली घसरला व एका झाडीत अडकला. किल्ल्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांच्या मदतीने त्यांच्या मित्रांनी त्याला झाडीतून बाहेर घेतले ; पण त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो उभा राहू शकत नव्हता. शिवदुर्ग रेस्कु टिम ट्रॅफिक मधून वाट काढत पाटण गावात पोचली. स्थानिक नागरिक व टिमने स्ट्रेचरवर किल्ल्याच्या मध्यावरुन खाली सुरक्षीत उचलून आणले. व लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करून पुणे येथे हलवले.
शिवदुर्ग रेस्कु टिमचे सदस्य महेश मसने, सागर कुंभार, रोहित वर्तक, योगेश उंबरे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी शशिकांत बेल्हेकर. साईनाथ सस्ते पाटील व प्रफुल्ल नरवडे या पुण्यातील युवकांनी या रेस्कुमध्ये मोलाचे सहकार्य केले. ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!