आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये स्वछता उपक्रम’.

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये स्वछता उपक्रम’.Swachata Activities in Krishnarao Bhegade English Medium School’.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २ ऑक्टोबर.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘स्वछता ही सेवा ‘ या मोहिमेअंतर्गत स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी प्रथम महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दुसरीतील श्लोक भागवत व इयत्ता पाचवीतील जनकनंदिनी झा या विद्यार्थ्यानी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांवर भाषण दिले.

शाळेच्या मुख्याध्यापिका  मीना अय्यर यांनी आपल्या भाषणात सांगीतले, की देशातील स्वछतेबरोबर भ्रष्टाचारही नाहीसा झाला पाहिजे. संस्थेचे खजिनदार  अनिल ताणकर यांनी याप्रसंगी विध्यार्थ्यांना स्वछतेचे महत्त्व सांगून, गांधीजींचे सत्य बोलावे यावरील आत्मचरित्र वाचावे हे सांगून, वाचन करावे, हे मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे व खजिनदार  गौरी काकडे उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  लावण्या भुजबळ यांनी केले. पुष्पलता व्यवहारे यांनी आभार मानले. यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व वर्गांची व शाळेच्या आतील व बाहेरील आवारातील स्वछता केली. सर्व विध्यार्थी झाडू, सुपली व खराटा हातात घेऊन स्वछता करत होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर पर्यवेक्षिका  ज्योती सावंत, रमा बागुल, कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या. शाळेतील सर्व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!