ताज्या घडामोडी

पालघर जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक संवाद दौरा

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.24
वर्षानुवर्षे पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक विभागाच्या पे युनिट व लेखा अधिकारी कार्यालयासाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्या लवकरच बंद होतील. पंधरा दिवसांमध्ये ही कार्यालये सुरू होतील असे सुतोवात आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
कोकण शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी गुरुवारी (ता.24) पालघर तालुक्यात म.नी. दांडेकर हायस्कूल (आर्यन ) पालघर, राजगुरू ह. म. पंडित विद्यालय सफाळे, वसई तालुक्यात अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर विरार व न्यू इंग्लिश स्कूल वसई शिक्षक संवाद दौरा सभा झाल्या.
यावेळी शिक्षकांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील शाळांचे 3 कोटी 80 लाख अनुदान प्राप्त झाले असून लवकरच मिळणार आहे. अर्धवेळ ग्रंथपालांना लवकरच पूर्णवेळ करण्यासाठी प्रयत्न केले जातील, शाळांमध्ये शिक्षक,लिपिक शिपाई रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, पालघर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी तसेच येत्या 2 मार्च रोजी पालघर येथे मुंबई उपविभागीय शिक्षण संचालक,पालघर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी व पे युनिटचे अधीक्षक यांची संयुक्त सभा आयोजित केली जाईल असे सांगितले.
यावेळी मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदूलाल घरत, विरार, अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक, सफाळे ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष खांती दोशी, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, बेसिन एज्युकेशन सोसायटी वसईचे सचिव सुरेश वायगंकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे कोअर कमिटी प्रमुख प्रमोद पाटील, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक विलास पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भानुदास तुरकामे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, माजी अध्यक्ष चिंतामण ठाकूर, सिल्वस्टर परेरा,मायकल घोन्सलवीश, रखमा ढोणे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव नामदेव पाटील, पतपेढी संचालिका प्रगती पाटील, सुचित्रा पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेगवेगळ्या समस्या मांडून आपल्या समस्या, मागण्यांचे निवेदन आमदारांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!