ताज्या घडामोडी

जत येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

Spread the love

सांगली दि. २५ःजत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे वतीने मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाप्रतिनिधी प्रा. व्ही .पी.कुलकर्णी यांनी दिली.

जत येथील जत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रविवार२७फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ,प्रमुख पाहुणे म्हणून कवी लवकुमार मुळे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. माणिक कोडग, प्रा. पी. व्ही. वठारे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!