आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’..आमदार सुनिल शेळके

Spread the love

अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ ..आमदार सुनिल शेळके.Action should be taken against those erecting unauthorized hoardings and the officials supporting them’ ..MLA Sunil Shelke.

आवाज न्यूज : रावेत प्रतिनिधी,  १७ एप्रिल.

वाऱ्यासह झालेल्या पावसात देहूरोड- कात्रज बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्या बाजुला लावलेले एक होर्डिंग्ज कोसळले. या दुर्घटनेत दुर्दैवाने चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यु झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.

‘अशा अनधिकृत होर्डिंग्जमुळे आजपर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत होर्डिंग्ज जाहिरात कंपनीकडून उभारले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई तर व्हावीच, परंतु त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असे आमदार सुनिल शेळके यांनी यावर बोलताना म्हटले.

तसेच, रावेत परिसरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अशा घटनांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आमदार शेळके यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!