ताज्या घडामोडी

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी माफी मागावी..अन्यथा राजभवनवर मोर्चा – विजयसिंह महाडिक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधान मागे घेऊन समस्त शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा अखिल भारतीय मराठा सेवा संघ आणि महाराष्ट्रातील समस्त शिव शंभू प्रेमी मुंबई येथील राज भवनावर मोर्चा काढतील असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना विजयसिंह महाडिक म्हणाले, राज्यपाल पद हे महत्वाचे घटनात्मक पद आहे. त्यामुळे आम्ही देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना राज्यपाल यांचे विरोधात तक्रारीचे पत्र पाठवणार आहे. या पदावर असताना राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी एका भाषणात छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. त्याच्या व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यांनी केलेले विधान अतिशय चुकीचे आहे. त्यांचे वय झाले असल्यामुळे कदाचित त्यांचा स्मृतीभ्रंश झाला असावा असे आम्हाला वाटत आहे. त्यांनी काढलेले अनुउद्गगार मागे घेऊन माफी मागावी. अन्यथा संतप्त झालेल्या शिव शंभू प्रेमी कोणाचीही गय न करता राज भवनावर मोर्चा काढण्यात मागे पुढे पाहणार नाही.

दोन दिवसात याबाबत राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी समस्त शिव शंभू प्रेमींना उत्तर द्यावे. त्यांनी आपले अपशब्द व आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागितली नाही तर मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून उठाव होईल. त्यानंतर जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर मात्र यास सर्वस्वी जबाबदार ते स्वतः असतील. याची संबधित यंत्रणेने नोंद घ्यावी व संतप्त झालेल्या शिव शंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करून राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी समाज माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी.राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी माफी मागावी याकरिता पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत बोलताना विजयसिंह महाडिक शेजारी मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!