ताज्या घडामोडी

महाशिवरात्री निमित्त मा . सौ . सविता डांगे यांनी केले ३०० शिवलिंग पिंडीचे चौंडी येथे पुजन

Spread the love

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री व चौंडी विकास योजनेचे शिल्पकार मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांच्या सुनबाई व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ इस्लामपूरच्या अध्यक्षा मा . सौ . सविता विश्वनाथ डांगे ( वहिनी ) यांनी महाशिवरात्री निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गांवी चौंडी . ता . जामखेड , जि . अहमदनगर येथे ३०० शिवलिंग पिंडी स्व:ता तयार करून चौंडी येथे मनोभावे पुजन करून रूद्र अभिषेक मुख्य शिवपिंडीवर केला .

 

गेल्या वर्षापासुन सौ . सविता विश्वनाथ डांगे (वहिनी) ह्या महाशिवरात्री निमित्त हा भावनीक व मनोभावे उपक्रम राबवित आहेत.महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री , धनगर समाजाचे राज्याचे नेते , मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांनी या चौंडी परिसरात अनेक वर्षे मुक्कामी राहून चौंडी विकासाचा कायापालट केला आहे . याठिकाणी असणारे अहिलेश्वर मंदीर , चौंडेश्वरी , सिनेश्वर महादेव मंदीर , मारूती मंदीर यांचा जिर्णोद्वार तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा भव्य किर्ती स्तंभ उभारला आहे , लोकोपयोगी एक भव्य हॉल उभारला आहे . नाविन्यपूर्ण अशी शिल्प सृष्टी , तसेच या ठिकाणी असणाऱ्या सिना नदीवर मोठा येणे – जाणेसाठी पुल बांधला आहे .

यासह अनेक विकासात्मक कामे शासनाच्या निरनिराळ्या योजना राबवून चौंडी या गावाचा कायापालट केला आहे . या मुळे चौंडी एक पर्यटन स्थळ निर्माण झालेले पहावयास मिळते.

मा . सौ . सविता विश्वनाथ डांगे ( वहिनी ) यांनी चौंडी येथील शिवपिंडी वरती पहाटे रूद्र अभिषेक करून विधिवत पुजा केली . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शिवपिंडी वरती असणारी श्रध्दा, शक्ती सर्वांच्या पुढे सतत जागृत रहावी या भावणेतुनच हा उपक्रम सुरू केला आहे. या त्यांच्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे . महाशिवरात्री निमित्त ३०० शिवलिंग तयार करण्यासाठी सुशांत सिध्द , विशाल पाटील , दत्तात्रय शेलार , सुनिल टिळे , जयराज डांगे यांनी सहकार्य केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!