ताज्या घडामोडी

मुरूम शहरात वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी)

वीरशैव कक्कय्या महाराज यांची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीर कक्कय्या महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने ९१७ वी जयंती मंगळवारी (ता.१ ) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संतोष थोरात, दत्ता चौगुले आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. किरण गायकवाड, आनंद कांबळे, देवराज संगुळगे आदींनी मनोगत व्यक्त केले. बाबा खरटमल, दत्ता खरटमल, विनोद कोकणे, सुनील खरटमल, धनराज शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, गिरीश शिंदे, मनोज शिंदे, धीरज शिंदे, मल्हारी कटके, श्रवण कोकणे, बाबूस खरटमल, दिंगबर सोनटक्के आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!