ताज्या घडामोडी

श्री.मिलिंद धर्माधिकारी यांचा सत्कार

Spread the love

आरळा गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी शिराळा येथील निवृत्त उप अभियंता श्री मिलिंद धर्माधिकारी उर्फ आवळे साहेब यांची नुकतीच शिराळा तालुका मार्केट कमिटी मध्ये संचालक पदी तसेच *बारा बलुतेदार विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रमुख* म्हणून नुकतीच निवड झाली
श्री आवळे साहेब हे विद्युत वितरण कंपनीत असताना सदैव जनतेच्या सेवेसाठी काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. गेल्या दोन वर्षापूर्वी निवृत्तीनंतर त्याच उत्साहाने त्यांनी सामाजिक कार्याला झोकून घेतले आहे. _गरिबी पाचवीला पुजलेल्या तालुकाच्या डोंगर कपारीतील गरजूंसाठी आवळे साहेब सतत झटताना दिसत आहेत_ . याची दखल घेऊन नुकतीच त्यांची या दोन पदावर निवड झाली.
*शिराळा तालुका काँग्रेस कमिटी कडून त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!